बचत ठेव योजना

ही योजना गुंतवणूकदारांना असा सल्ला देते की, ग्राहक आपली रु.१००/- पासून या खात्यात रक्कम जमा करू शकतात. या योजनेत गुंतवणूकदारांना जमा रक्कमेवर  सरासरी ४% व्याज मिळेल.

आवर्त ठेव योजना

आवर्त ठेव योजनेचे खाते म्हणजे काय?

आवर्त ठेव खाते म्हणजे, त्यामध्ये गुंतवणूकदार पतपेढीत एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ठ कालावधीसाठी जमा करतो (साधारणत: एक ते पाच वर्षासाठी). ह्या योजनेचा अर्थ, गुंतवणूकदार एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करून त्याची काही वर्षानंतर एकगट्ठा रक्कम मिळवू शकतो. एक छोटी महिन्याची ठेव, आवर्त ठेव योजना जमाकर्त्याला एक चांगली रक्कम त्याच्या परिपक्वतेच्या काळात मिळवू शकतो. ह्या वरील व्याज ठराविक जमा योजनेच्या दराप्रमाणे तिमाही गणले जाते.

ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपली रक्कम एका विशिष्ठ कालावधी साठी गुंतवू शकतो आणि खालीलप्रमाणे व्याजासह रक्कम मिळवू शकतो. ह्या योजनॆत कमीत कमी रू.१००/- रुपयापासून रक्कम गुंतविता येते..

  
     
      
      
      
      
      
      
      
      
      

उदा.

प्रत्त्येक महिन्यात

भरावयाची रक्कम 

कालवधी १२ महिने 

व्याज दर ८.५ % 

रू.१००/-

रू.१२५०/-

रू.२००/-

रू.२४९९/-

रू.३००/-

रू.३७४९/-

रू.४००/-

रू.४९९८/-

रू.५००/-

रू.६२४८/-