संस्थेस मिळालेले पुरस्कार

राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्था वर्धा आयोजित सहकार शताब्दी वर्षानिमित्त (सन १९०४ ते २००४) पुरस्कारामध्ये संस्थेस सलग दोन वेळा महाराष्ट्र राज्यातील एक अत्युकृष्ट संस्था म्हणून पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

सन २०००-२००१ : महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई आयोजित उत्कृष्ट अहवाल तृतीय क्रमांकाचे पुरस्कार मा. ना. बाळासाहेब विखेपाटील (केंद्रीय अर्थ राज्यमंत्री) यांच्या प्रमुख उपस्थिती व मा. ना. विजयसिंहदादा मोहिते पाटील (सार्व. बांधकाम मंत्री) यांच्या शुभहस्ते पुणे येथील महाअधिवेशनात देण्यात आले.

सन २००१/२००२ : पुणे विभागातून उत्कृष्ट अहवाल प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मा. सहकार आयुक्त श्री. रात्नाकरजी गायकवाड यांच्या शुभहस्ते व मा. ललित गांधी ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन) यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे देण्यात आले.

सन २००९-२०११: पुणे विभागातून आदर्श पतसंस्था म्हणून द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मा. काकासाहेब कोयटे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन) यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

सन २०१०/२०११ : संस्थेस नुकतेच महाराष्ट्र राज्यातील पत्संस्थेमधून महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्याकडून “राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था” म्हणून द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मा. सहकार आयुक्त व निबंधक मा. श्री. मधुकरराव चौधरी यांच्या शुभहस्ते देवून गौरविण्यात आले आहे.

सन २०१२ : महाराष्ट्र राज्य सहकार शताब्दी वर्ष यानिमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. के. शंकरनारायणन यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेस “महाराष्ट्र शासन ‘सहकाररनिष्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सन २०१३ : सहकार सुगंध, पुणे आयोजित नागरी सहकारी बँका व पतसंस्थांसाठीची राज्यव्यापी वार्षिक अहवाल स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र विभागातून संस्थेस प्रथम क्रमांकाचा सहकार सुगंध पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे, सहकार मंत्री मा. श्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते देवून गौरविण्यात आले.

महाराष्ट्र शासनाकडून सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. जिल्हाउपनिबंधक कार्यालय, मा. उपनिबंधक कार्यालय सोलापूर आयोजित कार्यक्रमामध्ये मा. सौ. निशिगंधा माळीमॅडम (अध्यक्षा-सोलापूर जिल्हापरिषद, सोलापूर) यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

सन २०१४ “सहकारसुगंध” पुणे यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मा. श्री दिनेश ओऊळकरसाहेब (अप्पर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या शुभहस्ते देवून गौरविण्यात आले.  

सन २०१६/१७ राज्य सह. पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार मा. श्री काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते देवून गौरव.

सन २०१६/१७ मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने “राज्यस्तरीय गुणीजन आदर्श पतसंस्था २०१७” सन्मानपत्र व मेडल देवून गौरव.

सन २०१६/१७ अविज पब्लीकेशन व गॅलक्सी इनमा पुणे या संस्थेच्या वतीने “बँको पुरस्कार २०१६” मा. मुकुंदराव अभ्यंकरसाहेब (कॉसमॉस ग्रुप) यांच्या शुभहस्ते पुरस्कार देवून गौरव.

सन २०१७/१८ अविज पब्लीकेशन व गॅलक्सी इनमा पुणे या संस्थेच्या वतीने “बँको पुरस्कार २०१७” पुरस्कार देवून गौरव.

सन-२०१७/१८ महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन लि.कडून “दिपस्तंभ पुरस्कार” देवून गौरव.

सन-२०१८/१९ महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन लि.कडून “दिपस्तंभ पुरस्कार” देवून गौरव.

Choudeshwari pathpedhi

संपर्क

Copyright © 2019 Choudeshwari |Developed By advertdigitalmantra.com

Powered by advertdigitalmantra.com