ठेव योजना

मुदत ठेव व्याजदर

मुदत ठेव योजनाव्याजदर (द.सा.द.शे.)
३० दिवस ते ९० दिवस५%
९१ दिवस ते १८० दिवस५.५%
१८१ दिवस ते १ वर्षांचे आत६%
१ वर्ष ते पुढे८.५%

विशेष सवलत : जेष्ठ नागरिकांसाठी ०.५ जादा व्याज

रिकरिंग ठेव ( आवर्तक ठेव ) व्याजदर

रिकरिंग ठेव ( आवर्तक ठेव )व्याजदर
१ वर्ष ते पुढे७.५ %
सेव्हिंग्ज ठेव४ %
संक्षेप ठेव४.५ % ते ६ %
दामदुप्पट ठेव११२ महिने

लक्षाधिश रिकरिंग ठेव योजना

दरमहा रु.३८६०/- भरा२४ महिने नंतर मिळावारु.१००१९०/- 
दरमहा रु.२४८०/- भरा३६ महिने नंतर मिळावारु.१००३२६/- 
दरमहा रु.१७९०/- भरा४८ महिने नंतर मिळावारु.१००३६६/- 
दरमहा रु.१३८०/- भरा६० महिने नंतर मिळावारु.१००५९०/- 
दरमहा रु.११००/- भरा७२ महिने नंतर मिळावारु.१००१११/- 
दरमहा रु.५५०/- भरा७२ महिने नंतर मिळावारु.५००५६/-

आकर्षक ठेव योजना

श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, सोलापूर संस्थेकडे अनेक आकर्षक ठेव योजना आहेत. या ठेव योजनेत आपले रक्कम गुंतवून जास्तीत जास्त व्याजाचा लाभ मिळवू शकता.

मुदत ठेवव्याजदर (द.सा.द.शे.)
३० दिवस ते ९० दिवस५%
९१ दिवस ते १८० दिवस५.५%
१८१ दिवस ते १ वर्षांचे आत६%
१वर्ष ते पुढे७.५%

विशेष सवलत :- जेष्ठ नागरीक ०.५० % जादा व्याज

मासिक ठेव योजना

ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपली एक विशिष्ठ रक्कम एकदाच गुंतवू शकतो आणि प्रत्येक महिन्यात खालीलप्रमाणे लाभ मिळवू शकतात.

ह्या योजनेत खालीलप्रमाणे रक्कम गुंतवा आणि एका विशिष्ठ कालावधी नंतर खाली नमुद केल्याप्रमाणे नफा मिळवा:

सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ७.५ % व्याजदर

क्ररक्कमदरमहा व्याज१२ महिने 
रू१०,०००/-रू.६२/-रू.७४४/- 
रू२०,०००/-रू.१२४/-रू. १४८८/- 
रू३०,०००/-रू.१८६/-रू.२२३२/- 
रू५०,०००रू.३११/-रू.३७३२/- 
रू७५,०००/-रू.४६६/-रू.५५९२/- 
रू१,००,०००/-रू.६२१/-रू७४५२/- 

जेष्ठ नागरिकांसाठी ८ % व्याजदर

क्ररक्कमदरमहा व्याज१२ महिने
रू१०,०००/-रू.६६/-रू.७९२/-
रू२०,०००/-रू.१३२/-रू.१५८४/-
रू३०,०००/-रू.१९९/-रू.२३८८/-
रू५०,०००/-रू.३३१/-रू.३९७२/-
रू७५,०००/-रू.४९७/-रू.५९६४/-
रू१,००,०००/-रू.६६२/-रू. ७९४४/-

दाम दुप्पट ठेव योजना

श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, सोलापूर गुंतवणूकदारांना एका विशिष्ठ कालावधीत आपली रक्कम दुप्पट करण्याची संधी देत आहे. ह्या योजनेचे नावच सगळे सांगून जात आहे. ह्या योजने अंतर्गत एक विशिष्ठ रक्कम एकदाच गुंतवून कमीत कमी वेळात दुप्पट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या योजनेनुसार गुंतवणूकदाराची जमा केलेली रक्कम ११२ महिन्यात दुप्पट होते. उदा.जर रू.१,००,०००/- गुंतविले तर ११२ महिन्यांनी रू.२,००,०००/- मिळतील.

गुंतवणूक रक्कम कालावधी परत मिळणारी रक्कम

रू.१,००,०००/- ११२ महिने रू.२,००,०००/-

दैनंदिन ठेव योजना ( संक्षेप ठेव )

एक मराठीत प्रचलित म्हण आहे “थेंबे थेंबे तळे साचे” ह्या मूळे आमची एक योजना खुप प्रसिद्ध झाली आहे ती म्हणजे “दैनंदिन ठेव योजना”. हे शब्द सुचवतात की ह्या योजनेत थोडे थोडे जमवा आणि अधिक कमवा.

ह्या योजनेत दररोज बचत करण्याची योजना मांडली आहे. ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार कमीत कमी रू. २०/- किंवा अधिक दररोज बचत करू शकतो. आमच्याकडे अधिकृत प्रतिनीधि आहेत कि जे गुंतवणूकदारांच्या राहत्या घरातून किंवा त्यांच्या व्यापाराच्या जागेवरून दररोज रक्कम गोळा करतात. दैनदिन अधिकृत प्रतिनिधीना खाते पुस्तक अपडेट करण्यासाठी संगणकयुक्त मशिन पुरवण्यात आल्या आहेत. गुंतवणूकदारांचे खाते पुस्तक प्रत्येक महिन्यातून एकदा शाखेत व्यवस्थित तपासून देण्यात येईल. गुंतवणूकदारांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो.

बचत ठेव योजना

ही योजना गुंतवणूकदारांना असा सल्ला देते की, ग्राहक आपली रु.१००/- पासून या खात्यात रक्कम जमा करू शकतात. या योजनेत गुंतवणूकदारांना जमा रक्कमेवर सरासरी ४% व्याज मिळेल.

आवर्त ठेव योजना

आवर्त ठेव योजनेचे खाते म्हणजे काय?

आवर्त ठेव खाते म्हणजे, त्यामध्ये गुंतवणूकदार पतपेढीत एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ठ कालावधीसाठी जमा करतो (साधारणत: एक ते पाच वर्षासाठी). ह्या योजनेचा अर्थ, गुंतवणूकदार एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करून त्याची काही वर्षानंतर एकगट्ठा रक्कम मिळवू शकतो. एक छोटी महिन्याची ठेव, आवर्त ठेव योजना जमाकर्त्याला एक चांगली रक्कम त्याच्या परिपक्वतेच्या काळात मिळवू शकतो. ह्या वरील व्याज ठराविक जमा योजनेच्या दराप्रमाणे तिमाही गणले जाते.

ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपली रक्कम एका विशिष्ठ कालावधी साठी गुंतवू शकतो आणि खालीलप्रमाणे व्याजासह रक्कम मिळवू शकतो. ह्या योजनॆत कमीत कमी रू.१००/- रुपयापासून रक्कम गुंतविता येते..

उदा.८.५ 

प्रत्त्येक महिन्यात भरावयाची रक्कम    कालवधी १२ महिने
व्याज दर ७.५%    
रू.१००/-   रू.१२५०/-   
रू.२००/-   रू.२४९९/-   
रू.३००/-   रू.३७४९/-   
रू.४००/-   रू.४९९८/-   
रू.५००/-   रू.६२४८/-