आमच्याबददल....

३२ वर्षाची यशोगाथा...

वित्तीय संस्थेची गरज समाजातील श्रमिक वर्ग गरजेच्या वेळी सावकारी करणाऱ्या व्यक्तीकडून जास्त व्याजदराने कर्ज घेऊन व्याज भरण्यातच त्याचा श्रमाचा संपूर्ण पैसा जात असे, त्यांना या संकटातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने वित्तीय संस्थेची गरज आहे हे ओळखून दि.२६/०१/१९८६ रोजीच्या युवक संघटनेच्या कार्यकारणी सभेमध्ये तत्कालीन अध्यक्ष श्री. रामकृष्ण वि. उदगिरी यांनी पतसंस्थेची कल्पनेचे मुहूर्तमेढ केली..

मुख्यप्रवर्तक यांची निवड याच कार्यकारणी मिटींगमध्ये नियोजित पतपेढीचे मुख्य प्रवर्तक म्हणून श्री. रामचंद्र शेषप्पा पुडूर यांची निवड करण्यात आली. सभासद व भागभांडवल जमा नियोजित पतपेढीसाठी सभासद व भागभांडवल जमा करण्याचे काम सुरु करण्यात आले. संस्थेचा प्रथम सभासद म्हणून श्री. अशोक उदगिरी यांच्याकडून रु.१००/- भागभांडवल जमा करून घेण्यात आले. सुरुवातीस एकूण भागभांडवल रु.६९५४०/- इतके जमा झाले. या काळात बऱ्याचश्या अडचणी आल्या त्यात भर म्हणून महाराष्ट्र शासनाकडून नवीन पतसंस्थेस नोंदणी बंद करण्यात आले होते.
खास बाब म्हणून संस्थेची नोंदणी तत्कालीन आमदार कै.बाबुरावअण्णा चाकोते यांचे चिरंजीव महादेव चाकोते याचे विशेष परिश्रमामुळे आपल्या प्प्रयत्नास यश आले व तत्कालीन सहकार राज्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांना सोलापूर दौर्यावेळी पतसंस्था नोंदणीविषयी निवेदन देण्यात आले. मुख्यप्रवर्तक प्रवर्तक यांचे प्रमाणि प्रयत्न तळमळ पाहून खास बाब म्हणून संस्थेस नोंदणी करण्यास मा. सह. खात्यास कळविण्यात आले. व दि.११/१/१९८८ रोजी संस्थेची शासनाकडून रितसर नोंदणी झाली.

बँकींग कामकाजाविषयी विशेष मदत

सुरुवातीस संस्थेचे संचालक श्री. श्रीनिवास दत्तात्रय गट्टी व श्री. अरुण माधवराव चिंता यांनी आपली नौकरी सांभाळून सकाळ संध्याकाळ वेळेचे बंधन न पाळता विनामोबदला व्यक्तीशः लक्ष दिल्यामुळे आपल्या पतपेढीचे दैनंदिन व्यवहार बँकेप्रमाणेच करण्यात येऊ लागले. तदनंतर जिल्हा उद्योग बँकेचे अधिकारी कै. विष्णू यलप्पा कौकुंटला यांनी बँकीग व्यवहाराबाबत सतत मार्गदर्शन केले.

कर्ज रूपाने आर्थिक सहाय्य

समाजारील तळागाळातील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने सुरुवातीच्या काळात सन १९८८ साली पहिले कर्जदार म्हणून श्री. नारयण व्यंकप्पा रंगम यांना रु.२०००/- चे कर्ज मंजूर करून अदा केले. आज विविध प्रकारचे कर्जे यामध्ये – मध्यम मुदत जागा तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, व्हेईकल कर्ज, सोनेतारण कर्ज, कॅशक्रेडीट कर्ज, कॅशक्रेडीट अदर सिक्यु. कर्ज, गृहकर्ज, मशिनरी कर्ज, शैक्षणिक कर्ज, दुर्बलघटक इ. कर्जाचा माध्यमातून रु.१००००/- पासून ते ५०.०० लाख कर्ज मर्यादेपर्यंत संस्थेने सभासदांना कर्ज अदा केली आहे.

दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य

आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून मध्यम व कनिष्ठ वर्गीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना सोनेतारणावर कर्ज देण्याचे व्रत घेतले होते. तसे विडी कामगार, फळ-भाजी विक्रेते, श्रमिक वर्ग अशा कमी उत्पन्न घटातील आर्थिक दुर्बलांना कर्जे देऊन त्यांना खाजगी सावकारी पाशातून मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे सदर विभागासाठी दिलेल्यांची कर्जे व्यवस्थितरीत्या वसूल होत आहेत.

पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा

दि.१७/१/१९८८ रोजी सभासदाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली. सदर सभेमध्ये शासनाकडून मंजूर होवून आलेले पोटनियम स्विकारण्यात आले. पोटनियमातील तरतुदीनुसार सन १९८७-८८ ते १९९१-९२ या पाच वर्षाकरिता खालीलप्रमाणे मा. संचालक मंडळ निवड करण्यात आली. १) श्री. रामचंद्र शेषप्पा पुडूर २) श्री. वसंतराव नारायणराव उदगिरी ३) श्री. रामकृष्ण विठ्ठलराव उदगिरी ४) श्री. विरेंद्र माधवराव चिंता ५) श्री. डॉ. एन. सी. रंगम ६) श्री. व्यंकटेश तुकाराम सोमनाथ ७) श्री. विश्वनाथ अंबाजी गट्टी ८) श्री. श्रीनिवास दत्तात्रय गट्टी ९) श्री. अरुण माधवराव चिंता तदनंतर निवडून आलेले मा. संचालक मंडळ याची सभा होऊन त्यामध्ये सन १९८७-८८ सालाकरिता चेअरमन म्हणून श्री.रामचंद्र शेषप्पा पुडूर, व्हा. चेअरमन श्री. वसंतराव नारायणराव उदगिरी व शेक्रेटरी म्हणून श्री. रामकृष्ण विठ्ठलराव उदगिरी यांची एकमताने निवड करण्यात आले. पतपेढीच्या स्तापनेपासून आजतागायत संचालकांनी कुठल्याही प्रकारे भत्ते व मिटींग भत्ता घेतलेली नाहीत. ही संस्थेस भूषणावह बाब आहे. पतपेढी कार्यालय उदघाटन व प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात २६ जानेवारी १९८८ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तत्कालीन आमदार कै.बाबुरावअण्णा चाकोते यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे उदघाटन होवून प्रत्यक्ष व्यवहारास प्रारंभ करण्यात आले. सुरुवातीस एका १० x १० रूम मध्ये संस्थेचा व्यवहार सुरु झाला.

कार्यालय नुतनीकरण व काऊटरचे शुभारंभ

सुरुवातीस १० x १० रूम मध्ये एक टेबल व खुर्ची मांडून व्यवहार सुरु करण्यात आले होते. दैनंदिन व्यवहार वाढत जावून सदरची जागा अपुरी पडत गेली. वाढीव जागा मिळणे विषयी मा. अध्यक्ष श्री. टोगटवीर क्षत्रींय समाज सोलापूर यांच्याकडे विनंती करण्यात येवून माननीयांनी तात्काळ संस्थेस वाढीव जागा उपलब्ध करून दिली. संस्थेच्या सभासदांना ठेवीदारांना व्यवहार करणे सोयीचे व्हावे. ही गरज ओळखून काऊटर तयार करून घेण्यात आले. या कार्यालय नुतनीकरण व काऊटरचे शुभारंभ मा. श्री. ह. ख. महावरकर (उपनिबंधक सह. संस्था. सोलापूर) यांच्या शुभहस्ते व तत्कालीन आमदार मा. कै.बाबुरावअण्णा चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२/११/१९९२ रोजी करण्यात आले.

ठेवीचे उद्धिष्टे पूर्ण

पतपेढीच्या सुरुवातीस पहिली दामदुप्पट ठेव रु.५००/- एवढे श्री. जगन्नाथ राधाकृष्ण जोशी यांनी ठेवली व पतपेढीचा पहिला ठेवीदार म्हणून मान त्यांच्याकडे जातो. सर्व संचालक मंडळ यांनी संस्था वाढविणे विषयी मनात खास धरून वेळोवेळी एकजुटीने निर्णय घेतल्याने पतपेढीचा पाया भक्कम झाला.आपल्या पत्पेधीमुळे समाजातील लोकांना विनासायास अल्पव्याजदराने आर्थिक मदत मिळू लागते.लहान लहान व्यवसाय उद्योग सुरु होवून त्याचे मोठ्या उद्योगात रुपांतर झाले. आपल्या पतपेढीमुळे समाजातील गरजुंना दिलासा मिळाला. मा. संचालक मंडळ यांनी प्रतिवर्षी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून काम केल्यानेच या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षापयंत नेत्रदीपक ठेवीचा ठप्पा गाठण्यात यश मिळालेले आहे. सुरुवातीस …
सन १९८८ साली रु. १ लाख ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण * सन २००८ साली रु. १० कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण सन १९९० साली रु. १० लाख ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण * सन २०११ साली रु. १६ कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण सन १९९६ साली रु. १ कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण * सन २०१२ साली रु. २१ कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण सन २००२ साली रु. ५ कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण * सन २०१६ साली रु. ५८ कोटी ठेवीचे उद्दीष्ट पूर्ण
सन २०१८ साली रु. ७० कोटी ठेवीचे उद्दीष्ट, सन २०१९ साली रु. ७८ कोटी ठेवीचे उद्दीष्ट.

Choudeshwari pathpedhi

संपर्क

Copyright © 2019 Choudeshwari |Developed By advertdigitalmantra.com

Powered by advertdigitalmantra.com