महाराष्ट्र शासन सहकार निष्ठ पुरस्काराने सन्मानित.

श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी सह. पतपेढी मर्या.,सोलापूर

आपल्या कष्टाच्या पैशाची जपवणूक करून योग्य परतावा , सुरक्षितता व उत्तम सेवा इत्यादी आर्थिक व्यवहारांबरोबर सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणारी पतसंस्था.

संस्थेची वैशिष्ठे

आमच्याबददल..

संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार खातेदार व हितचिंतक या सर्वांना ही वेबसाईट सादर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपल्या संस्थेची स्थापना होऊन ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Previous
Next

संस्थेची ठळक वैशिष्ठे

• कुशल अनुभवी संचालक मंडळ.
• ३२ वर्षाची अविरत सुस्सज सेवा.
• नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज पद्धती.
• विविध कर्ज अंतर्गत सुलभ अल्प व्याजात कर्ज पुरवठा.
• प्रशिक्षित कर्मचारी वृंद.
• आकर्षक ठेव योजना.

ठेवी / जमा योजना

• बचत ठेव योजना
• मुदत ठेव योजना
• दैनंदिन ठेव योजना
• मासिक ठेव योजना
• आवर्त ठेव योजना
• लक्षाधिश रिकरिंग ठेव योजना
• दाम दुप्पट ठेव योजना

कर्ज योजना

• सोने तारण कर्ज योजना
• नवीन घरबांधणी, ओनरशिप फ्लॉट खरेदी
• मध्यम मुदत जागा तारण कर्ज
• दुचाकी व चारचाकी वाहनासाठी कर्ज
• संगणक व इतर मशिनरीसाठी कर्ज
• राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र / किसन विकास पत्र / LIC पॉलीसी – तारणावर कर्ज
• व्यवसाय वृद्धीसाठी नजर गहाण कर्ज 

सल्ला पाहीजे?

आपल्याला कुठल्याहि प्रकारची माहिती साठी कॉल करा.

 0217-2744980

संस्थेस मिळालेले पुरस्कार &

  • सन २०००-२००१ : महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई
  • सन २००१/२००२ : पुणे विभागातून उत्कृष्ट अहवाल प्रथम क्रमांकाचे पुरस्कार
  • सन २००९-२०११: पुणे विभागातून आदर्श पतसंस्था म्हणून द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार

आमचे ध्येय...

या पतसंस्थेच्या वतीने आतापर्यंत सर्वच क्षेत्रातील शमिक महिला, दुर्बल घटक, तसेच लहान मोठे व्यापारी उद्योजक, डॉक्टर्स, यांना गरजेनुसार कर्ज पुरवठा करण्यात आलेले आहे. गेल्या ३२ वर्षात संस्थेचा कारभार वाढला असून सोलापूर शहराची व्याप्ती ही वाढलेली आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदारांच्या सोयीसाठी संस्थेने शाखा विस्तार केला. दि.२६ जानेवारी २००० रोजी विडीघरकुल शाखा, दि.५ ऑगस्ट २००० रोजी अशोक चौक शाखेचा आणि दि. ३ जानेवारी २००१ रोजी होटगी रोड शाखेचा शुभारंभ झाला. या सातहि  शाखा उत्तमरीत्या कार्यरत आहेत.

केवळ रु.६९ हजार भागभांडवल व रु.१ लाख १९ हजार ठेवीवर सुरु झालेल्या व्यवहाराचे आज कोटीत रुपांतर झालेले आहे. सध्याचे आर्थिक व सांपत्तिक स्थिती पाहिल्यास संस्थेकडे रु.४६.६१ लाख भागभांडवल, रु.२१६१.०७ लाख ठेवी, रु.१५१७.१९ लाख कर्जवाटप, रु.९८७.२४ लाख गुंतवणूक, रु.२६०२.९२ लाख खेळते भांडवल, रु.२१३.९२ लाख निधी, रु.५०.५१ लाख निव्वळ नफा, स्थापनेपासून ऑडीट वर्ग ‘अ’ असून थकबाकीचे शे.प्रमाण १.४२% व एन.पी.ए. चे प्रमाण ०% आहे.

आर्थिक व्यवहारा बरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून सभासदांचे गंभीर आजारावर शस्त्रक्रिया व उपचारासाठी सभासद कल्याण निधीतून आर्थिक मदत करण्यात येते. तसेच नैसर्गिक आपत्ती व इतर संकटकाळी यामध्ये कारगिल युद्ध, त्सुनामी पूरग्रस्तांसाठी मदत, बुकंप पुनर्वसनासाठी मदत इत्यादी साठी आर्थिक मदत संस्थेकडून प्राधान्याने करण्यात आलेले आहेत. दरवर्षी दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी व दि.२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी शालेय विद्यार्थ्याना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला जातो. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा यामध्ये शहर पातळीवर रंगभरणा व चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय वुशू स्पर्धा, प्रा.शेवडे यांचे ‘श्रीकृष्ण’ या विषयावर आध्यात्मिक प्रवचन, प्रा.विशुभाऊ बापट यांचे कुटुंब रंगलय काव्यात हा एकपात्री विनोद कार्यक्रम, दीपावली पडावा निमित्त पहाटगाणी इ. कार्यक्रम सभासदांसाठी आयोजित करण्यात आले त्यास उत्तम असा प्रतिसाद वेळोवेळी मिळाला.

आम्ही तुम्हाला तुमच्या ध्येयपूर्ती करिता मदत करू इच्छितो.

ChowdeshwariQRcode

Choudeshwari pathpedhi

संपर्क

Copyright © 2019 Choudeshwari |Developed By advertdigitalmantra.com

Powered by advertdigitalmantra.com